spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रज्जू परीपगार बाबत तात्काळ निर्णय घ्या – कॉ. राजेंद्र साठे 

– 1 मे कामगार दिनी रात्रभर आशा वर्कर्स ठिय्या आंदोलन करणार

नागपूर :- आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (CITU) च्या आशा वर्कर रज्जू परिपगार यांच्या सहपरिवार आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्याकरता शेकडो आशा वर्कर सह ए एन एम /जी एन एम व महानगरपालिकेचे अकाउंटंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्टेंबर 2025 पासुन थकीत मानधन द्या, सन्मा. उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 च्या अंतिम आदेशानुसार कार्यादेश मिळण्याबाबत, ऑगस्ट 2023 ते 31 मार्च 2025 पर्यंतचे PMMVY Online Portal लाभार्थी नोंदणी करण्याचा आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला द्या, सप्टेंबर 2025 पासून केंद्राचे थकीत आशा व गटप्रवर्तक यांचे केंद्राचे थकीत मानधन व इतर कामाचा मोबदला द्या. वरील मागण्याकरता 30 एप्रिल पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या जिल्हा समन्वयक रज्जु परीपगार सहपरिवार जिल्हा परिषद पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून सध्या उपोषण संविधान चौकात चालू असून आज उपोषणाच्या आठव्या दिवशी संविधान चौकात मोठ्या संख्येने आशा वर्कर यांनी जाऊन उपोषणाला सिटू तर्फे समर्थन जाहीर केले. समर्थन जैन करताना कॉ.राजेंद्र साठे यांनी सांगितले कि, शासन व प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असून रज्जु परीपगार यांची शारीरिक स्थिती दयनीय होत चाललेली आहे. शासनाने सन्माननीय उच्च न्यायालय नागपूर 16-12-2025 अंतिम आदेशानुसार कार्यादेश काढावा. शासनाने योग्य निर्णय घेतल्यास सी आय टी यु तर्फे आंदोलन केल्या जाईल व 1 मे कामगार दिनी आशा वर्कर संविधान चौकात रात्रभर ठिय्या आंदोलन करतील. आयटकच्या शहर अध्यक्ष फुलन गुटके सह काही आशा वर्कर आंदोलनाला समर्थन देण्याकरता उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा पुढील लढ्यात सोबत राहण्याचे आश्वासन दिले. समर्थन देण्याकरता सिटू तर्फे कॉ.राजेंद्र साठे, कॉ. प्रिती मेश्राम, उज्वला कांबळे, प्रतिमा डोंगरे, नीलिमा कांबळे, जीवनकला ढोके, शुभांगी चीचमलकर, शिल्पा हाडके, दीक्षा रामटेके, प्रेमलता मेश्राम सह मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या.

Popular Articles