spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंढरी येथे महाराष्ट्र दिनी विविध शालेय कार्यक्रमांचे आयोजन

किशोर साहू, मौदा :-1 में महाराष्ट्र दीन कार्यक्रम साजरा करून आठवा वर्ग निरोप समारंभ कार्यक्रम, विद्यार्थ्यांना वार्षिक निकाल गुणपत्रिका वाटप,पहिला वर्ग शाळा पूर्व तयारी अभियान मध्ये विद्यार्थी व पालक स्वागत,सत्कार मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. तसेच शाळा व ॲम्पॉवर फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने प्रश्न मंजुषा स्पर्धा परीक्षा 2026ही तीन वेगवेगळ्या गटात घेण्यात आली होती.त्याचे प्रथम,द्वितीय,तृतीय असे रोख बक्षीस व संयुक्त प्रमाणपत्र शाळा व ॲम्पॉवर फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देऊन त्यांचे सत्कार करून वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच चंदा गेडाम,शाळा अध्यक्ष उदय पांडे, उपाध्यक्ष मंगेश आंबिलढूके,मौसमी घरडे, अपर्णा घरडे,डॉक्टर रंगारी,सुरेखा श्रावणकर, आरती श्रावणकर, शीतल बागडे,नीता घरडे,मोनाली पटले,श्रीकांत पडोळे, श्रीनाथ पटले,शंकर पटले,निशांत उईके,रोशन देवतारे, श्रीकांत राऊत,मुख्याध्यापक विकास धारगावे सह इतर सर्व शिक्षक,शिक्षिका वृंद उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित मान्यवरांना गोड जेवण देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.