– विज्ञानात 97.46 टक्के, वाणिज्यात 78.43 टक्के तर कलात 75 टक्के निकाल
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत मनपाचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. तिन्ही प्रमुख शाखांमध्ये उत्तम निकाल लागला असून, विज्ञान शाखेत सर्वाधिक 97.46 टक्के निकाल नोंदविण्यात आला आहे.
बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र ( बाल्या)बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, शिक्षण विशेष समिती सभापती संतोषदेवी लढ्ढा, अतिरिक्त आयुक्त अंकित, शिक्षणाधिकारी माधुरी काटकर यांच्यासह संपूर्ण पदाधिकारी यांनी अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बारावीच्या परीक्षेत मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, ताजाबाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालय, आणि एम ए के आजाद उर्दू कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तीनही शाखेचा एकूण 86.49 टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेत एकूण 73 पैकी 71 विद्यार्थी उत्तीर्ण होत 97.26 टक्के निकाल लागला. तर वाणिज्य शाखेत 58 पैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण होत 78.43 टक्के निकाल नोंदविला गेला. कला शाखेत 44 पैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण होत 75 टक्के निकाल लागला.
एकूण निकाल 253 पैकी 205 विद्यार्थी उत्तीर्ण होत 86.49 टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
विज्ञान शाखेत अनुक्रमे निकाल :
श्वेता कोरे हिने 461 गुण (76.83%) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
सृष्टी आदमणे हिने 425 गुण (70.83%) मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
शिफा परवीन मो. नजीर अहमद हिने 379 गुण (70.67%) मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेत अनुक्रमे
अल्फिया परवीन हिने 409 गुण (68%) मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
सानिया कौसर हिने 406 गुण (67.67%) मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
तसमिया परवीन हिने 403 गुण (67.17%) मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
कला शाखेत अनुक्रमे:
हूरेन कौसर हिने याने 487 गुण (81.17%) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
मुसना बानो हिने 454 गुण (75.67%) मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
कैफियत नौशीन हिने 436 गुण (72.67%) मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
मागासवर्गीयमधून
प्रतीक्षा सोनकुवर हिने 379 गुण (63.17) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.