spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चिखलाबोडी येथे बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलाबोडी येथे बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन हे तीनही कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शरद लांजेवार, घनश्याम गिऱ्हेपुजे, छगन गिऱ्हेपुंजे, शरद घोनमोडे, शरद लांजेवार,दिपाली गिऱ्हेपुंजे, वैशाली पडोळे, शुभांगी गजभिये, गीता वरकडे , अस्मिता गिऱ्हेपुंजे , सोनू गिऱ्हेपूंजे , शालू वैरागडे ,वर्षा लांजेवार सह गावातील मान्यवर व विद्यार्थीवृंद उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक सुखराम रामटेके यांनी केली. त्यांनी विद्यार्थ्यांना या विशेष दिवसांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ओम गिरीपुंजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निकिता लांजेवार (स्वयंसेवी शिक्षिका) यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Popular Articles