spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जन बदलाव पार्टीकडून निष्पक्ष CID चौकशी, दोषींवर कठोर कारवाई व उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची तयारी

दिनांक – 12/04/2026 रोजी नरखेड पोलीस स्टेशन येथे नाना सोनबरसे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर 13 एप्रील रोजी त्यांना अटक करण्यात आली. कुटुंबीयांच्या गंभीर आरोपांनुसार, अटकेनंतर पोलीस कोठडीत नाना सोनबरसे यांच्यावर अमानुष व निर्दयी मारहाण करण्यात आली. त्यानंतर 14 एप्रील रोजी त्यांना नागपूर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले, जिथे 16 एफ्रील 2026 रोजी न्यायालयीन कोठडीत संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला. नाना सोनबरसे यांचे वडील शंकर सोनबरसे तसेच पत्नी यांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण प्रथमदर्शनी संशयास्पद, सुनियोजित व खोटे असल्याचे दिसून येते. पत्नीच्या म्हणण्यानुसार, नाना यांच्यावर एक वर्षापूर्वी नागपूर येथील AIIMS रुग्णालयात अंडकोषाची गंभीर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची शारीरिक अवस्था अशी नव्हती की ते बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करू शकतील. कुटुंबीयांकडे संबंधित वैद्यकीय कागदपत्रे व अहवाल उपलब्ध असून, त्यामुळे दाखल प्रकरणाच्या सत्यतेवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की पोलीस कोठडीत झालेली क्रूर मारहाण हीच नाना यांच्या मृत्यूमागील मुख्य कारण आहे. याशिवाय नागपूर सेंट्रल जेलमधील अंडा बॅरक क्रमांक 2 मध्ये घडलेल्या घटनांबाबत तेथे उपस्थित कैदी वसीम यानेही अनेक गंभीर खुलासे केले आहेत. त्यामुळे पोलीस व जेल प्रशासनाच्या संगनमताची किंवा निष्काळजीपणाची शक्यता अधिक गडद झाली आहे. नाना सोनबरसे हे अनुसूचित जातीतील (चर्मकार समाज) होते व त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे 3 एकर शेती आहे. कुटुंबीयांना संशय आहे की त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून कुटुंबाला त्रास देत त्यांची जमीन बळकावण्याचा सुनियोजित कट रचण्यात आला. हे संपूर्ण प्रकरण गृह मंत्रालय, राज्य पोलीस प्रशासन व कारागृह विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. सातत्याने वाढत असलेल्या पोलीस अत्याचाराच्या घटनांमुळे काही अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट होत असून, हे संविधान, मानवाधिकार व सामाजिक न्यायासाठी अत्यंत चिंताजनक आहे.

जन बदलाव पार्टीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

* नाना सोनबरसे यांचा पोस्टमार्टम अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्यात यावा

* नरखेड पोलीस स्टेशन व नागपूर सेंट्रल जेलमधील CCTV फुटेज सुरक्षित ठेवून सार्वजनिक करण्यात यावेत

* नरखेड पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस अधिकारी व जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) निष्पक्षपणे तपासण्यात यावेत

* पोलीस कोठडीत मारहाण व जेलमधील संशयास्पद मृत्यूस जबाबदार सर्व दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी

* संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी CID किंवा उच्चस्तरीय विशेष तपास यंत्रणेमार्फत करण्यात यावी

जन बदलाव पार्टीचे स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही तर हा केवळ एका कुटुंबावर अन्याय ठरणार नाही, तर संविधान, लोकशाही व सामाजिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांवर गंभीर आघात ठरेल. जन बदलाव पार्टी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व लोकशाही व कायदेशीर मार्गांनी संघर्ष करेल तसेच या प्रकरणासंदर्भात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याची तयारी करत आहे. राज्य सरकार व गृह मंत्रालयाने पोलीस अत्याचार, सत्तेचा गैरवापर व दलित समाजावरील अन्यायाच्या गंभीर प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून न्याय सुनिश्चित करावा, ही आमची ठाम मागणी आहे.पत्र परिषदेला उपस्थित साक्षीदार गोंदियातील साक्षीदार वसीम गाजी, नानाचे वडील शंकर किसन सोनबरसे उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.