spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वडोदा येथे पोलिसांची मोठी कारवाई,१०५ किलो गांजा जप्त, २ आरोपींना अटक

कामठी :- नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत १०५ किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई वडोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून, पोलिसांनी एकूण ६१ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २ मे २०२६ रोजी रात्री वडोदा पोलिसांच्या गस्ती दरम्यान उमरी फाटा येथे एका संशयास्पद ट्रकची (MH 40 BL 4445) तपासणी करण्यात आली. पोलिसांना पाहून आरोपी वाहन सोडून पळून गेले होते. ट्रकच्या कॅबिनमध्ये आणि डाल्यामध्ये वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पोत्यांत भरलेला १०५.१ किलो गांजा आढळून आला.

पोलिसांनी १०५.१ किलो गांजा किंमत २१,०२,००० रुपये,

ट्रक किंमत ४०,००,००० रुपये,

मोबाईल १०,००,००० रुपये किंमतीचे दोन संच

एकूण किंमत ६१,१२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे ४ मे २०२६ रोजी मध्य प्रदेशातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपीं मध्ये

प्रणयसिंग अमरसिंग दशमेर (वय २० वर्षे) – चालक (रा. पिपरिया, जि. शिवणी, म.प्र.) आणि रोहित रामप्रसाद मरकाम (वय १९ वर्षे) – क्लिनर (रा. पिपरिया, जि. शिवणी, म.प्र.) यांचा समावेश आहे.

या आरोपींवर एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८(क) आणि २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.