spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीत प्रतिबंधित ‘खर्रा’ बनवणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

– तिघांना अटक, लाखाचा मुद्देमाल जप्त

कामठी :- नागपूर शहर गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत कामठी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध खर्रा निर्मिती केंद्रांवर छापा टाकला. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून हजारो रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि मशीन जप्त करण्यात आल्या आहेत.

नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि खर्रा तयार केला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सहायक पोलीस निरीक्षक मंगला हरडे आणि त्यांच्या टीमने अन्न सुरक्षा अधिकारी एस. व्ही. बाभरे यांच्यासह तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.

या प्रकरणी कळमना रोड येथील रहिवासी आरोपी प्रवेश प्रकाश फकीरडे (३४) याच्या घरी छापा टाकला असता, तीन मशीनच्या सहाय्याने खर्रा बनवला जात असल्याचे आढळले. येथून ४८,४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

येरखेडा येथील रहिवासी अमित अशोक मते (३२) याच्या घरातून ८.५ किलो प्रतिबंधित साठा आणि वजन काटा असा एकूण ६,६०० रुपयांचा माल जप्त केला.

इस्माईलपुरा येथील रहिवासी नियाज उर्फ राजा अहमद (४५) याच्या घरी दोन मशीनद्वारे खर्रा निर्मिती सुरू होती. येथून ४३,८९० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता ( च्या कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.