spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांना लेह-लडाख येथे ‘इंटरफेथ डायलॉग’साठी वक्ता म्हणून निमंत्रण

– ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या कार्याचा गौरव

कामठी :- विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’च्या प्रमुख आणि माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांना लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनातर्फे आयोजित ‘तथागत भगवान बुद्ध पवित्र अस्थि प्रदर्शन २०२६’ अंतर्गत होणाऱ्या ‘आंतरधर्मीय संवाद’ कार्यक्रमात वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

हा सन्मान ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून जगात तथागत गौतम बुद्धांचा शांती, करुणा आणि अहिंसेचा संदेश पोहोचवणाऱ्या त्यांच्या महान कार्याची ही जागतिक पावती आहे.

लडाख प्रशासनाचे नोडल अधिकारी जिग्मेट टक्पा यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांना हे निमंत्रण पाठवले आहे.

बुद्ध धम्माच्या प्रसाराचा बहुमान

ॲड. सुलेखा कुंभारे यांनी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून देश-विदेशात माणुसकी आणि अहिंसेचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यांच्या याच निष्ठेची आणि सामाजिक सलोख्यासाठी असलेल्या वचनबद्धतेची दखल घेत लडाख प्रशासनाने त्यांना ८ मे २०२६ रोजी लेह येथील संबोधी कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित चर्चासत्रासाठी आमंत्रित केले आहे.

या कार्यक्रमात ॲड. सुलेखा कुंभारे  “पवित्र ज्ञान: एक करुणामय जगासाठी – शांती, सौहार्द आणि मानवी उत्कर्षासाठी आंतरधर्मीय मार्ग”. या विषयावर संबोधन करतील. हा कार्यक्रम दिनांक ८ मे २०२६, दुपारी २:०० वाजल्यापासून

संबोधी कॉन्फरन्स हॉल, महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर लेह-लडाख येथे आयोजित करण्यात आला आहे.

पवित्र अस्थि दर्शनाचे औचित्य

लडाखमधील चोगलामसर येथे १ ते १४ मे २०२६ या काळात २५६९ व्या वैशाख बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थिंचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

‘संघर्षाच्या काळात शांतता’ ही या महोत्सवाची मुख्य संकल्पना असून, याच व्यासपीठावरून ॲड. सुलेखा कुंभारे जागतिक शांततेवर आपले विचार मांडतील.

​या निमंत्रणामुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बौद्ध अनुयायांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.