– तालुक्याचा निकाल ९२.८८ टक्के,
– १५ विद्यालयाने गाठली शंभरी
– ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या विद्याथ्र्यांचे फोटो
कामठी :- विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी समजली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२६ ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये कामठी तालुक्याचा निकाल ९२.८८ टक्के लागला असून तालुक्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याने मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातील १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कामठी तालुक्यातील ५० शाळांमधून १४०१ मुले व १३५२ मुली असे एकूण २७५३ विघार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी १२५६ मुले (८९.६५) व १३०१ मुली(९६.२२) एकूण २५५७ विघार्थी (९२.८८) उत्तीर्ण झाले. या परिक्षेमध्ये तालुक्यातील ५७२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, ८४९ विद्यार्थी प्रथम श्रेणी तर ८४१ विद्यार्थी द्धितीय श्रेणीत तर २९५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. ![]()
तालुक्यातील कामठीच्या हाजीयानी खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल, सेठ रामनाथ लोईया हायस्कुल कामठी, रामकृष्ण शारदा मिशन माध्यमिक स्कूल, एन एम ब्राईट इंग्लिश स्कूल येरखेडा, अॅड. दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी, रामकृष्ण शारदा मिशन स्कूल ऑफ होम सायन्स, भांगे पब्लिक स्कूल पांजरा, प्रियांती इंग्लिष स्कुल तरोडी (बु), अनुसूचित जाती नवबौध्द मुलांची शासकीय शाळा वारेगाव, इंडियन आॅलंपियाड स्कुल भिलगाव, तायवाडे पब्लिक स्कूल कोराडी, भोसला मिलीटरी स्कुल पंचवटी, सनराईज कॉन्व्हेन्ट स्कूल महादुला, टर्निंग पॉईंट पब्लिक स्कूल खेडी, हिरांजली पब्लिक स्कूल भोवरी या १५ शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून मागील वर्षी २० शाळांनी शंभरी गाठली होती.
तर तालुक्यातील कामठीच्या सेंट जोसेफ काॅन्हवेंट हायस्कुल (९५.१४), सरस्वती शिशु मंदीर (९५.५८), शिक्षक सहकारी माध्यमिक शाळा(८०.७६), नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूल (९३.०३), एम.एम. रब्बानी हायस्कूल (९५.३८), नूतन सरस्वती बाॅईज हायस्कुल (८४.६१), इंदिरा हायस्कुल (५३.८४), देशभक्त रत्नप्पा कुंभार विद्यालय (७९.१६), अविनाश हायस्कूल (४०), हरदास हायस्कुल (७८.१२), मास्टर नूर मोहम्मद (९७.०५),सेठ कल्लनमियाॅ अंसारी हायस्कुल(९४.२८), प्रागतिक माध्य.विद्यालय कोराडी (९६.२४), तेजस्विनी माध्यमिक विद्यालय (९५.८७), विद्या मंदीर हायस्कूल कोराडी (९८.५६), सेवानंद विद्यालय महादुला (८९.८७),अष्विनी माध्यमिक विद्यालय बिना(८४.८४), पद्मश्री स्मिता पाटील कन्या विद्यालय महादुला(७५.६७), विवेकानंद विद्यालय पळसाड (९६.०७), टेमसना माध्यमिक विद्यालय टेमसना (८५.१८), स्वं. राजीव गांधी हायस्कुल सुरादेवी (७२.२२), पांडुरंग गवते विद्यालय भिलगाव(९०.३२), अॅड. दादासाहेब कुंभारे माध्यमिक विद्यालय खसाळा (७५), ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय पावनगाव (८०), प्रकाश हायस्कुल गुमथळा (८९.५३), आयडियल कॉन्व्हेन्ट गुमथळा (९६.१५), गांधी विद्यालय वडोदा (७८.४३), गुरूकुल पब्लिक स्कुल वडोदा (९५.४५), दिपछाया माध्यमिक निवासी आश्रम शाळा चिखली (५०), श्रीनाथ विद्यालय महालगाव (८५.७१), स्नेही विकास विद्यालय भुगाव (८६), राजीव विद्यालय जाखेगाव (४१.६६) असा असून आदर्श विद्यालय गुमथळा (गुमथी) या एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
कामठीच्या हाजीयानी खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल येथील महरीन फातिमा अशरफ जावेद (९६), जुनैरा फिरदौस मोहम्मद मुदस्सर (९४.६०),साराह अघाई इलमास अन्वर अघाई(९४.४०), सिद्रा एहतेशामुद्दीन रशीदी (९३.६०),झिक्साह इफ्फत शारिक नवाब (९३.२०), तमसील फातिमा शाहिद अली (९२.८०), नवीरा फातिमा नसीम अख्तर (९२.४०),सिम्रा फातिमा साकिब अथेर (९२.४०),तहुरा फातिमा मुनव्वर हुसेन (९२.२०), साराह अंबरीन सीमाब अन्वर (९२),मरयम फातिमा अतीकुज जमान (९१) टक्के गुण प्राप्त केले.