नागपूर :- पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व द्वारा गीता मंदिर नागपूर येथे राज्यस्तरीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी युवा भारतचे राज्य कार्यकारणी पदाधिकारी डॉ.निखिल भुते यांना पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ.परमार्थदेव महाराज यांच्या हस्ते आणि स्वामी रीतदेव महाराज व महाराष्ट्र राज्य संरक्षक राव यशपाल आर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, मोमेंटो, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, गेल्या अनेक वर्षापासून डॉ. निखिल भुते हे विविध सामाजिक कार्यक्षेत्रात नेहमीच अग्रेसर असतात, नि:शुल्क योग शिबिर, रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, विविध सामाजिक कार्यक्रमाचे अनेक वर्षापासून आयोजित करीत असतात. तसेच पतंजली फूड पार्क मिहान कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष योगदान होते, या कार्यक्रमाला पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी डॉ.परमार्थदेव महाराज, स्वामी रीतदेव महाराज, महाराष्ट्र राज्य संरक्षक राव यशपाल आर्य, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, निखिल मुंडले, भारत स्वाभिमानचे राज्यप्रभारी दिनेश राठोड, पतंजली योग समितीचे राज्यप्रभारी अनिल अमृतवार, राज्य कोषाध्यक्ष प्रदीप काटेकर, किसान सेवा समितीचे राज्यप्रभारी निलकंठ साबळे, शंकर नागापुरे, दीपक येवले, देविदास ठाकूर, डॉ.संजय खोंडे, डॉ.अविनाश कोकाटे आणि पतंजली परिवारातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, योगशिक्षक आणि योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन प्रदीप काटेकर, प्रस्ताविक दिनेश राठोड, आभार प्रदर्शन अनिल अमृतवार यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग शिक्षक व योगसाधकांनी विशेष परिश्रम घेतले.
पतंजली योग समितीच्या वतीने डॉ. निखिल भुते सन्मानित
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.