नागपूर :- सन्मार्ग नगर १, हुडकेश्वर रोडवरील, श्री हनुमान मंदिर येथे, नर्मदेश्वर शिवलिंग स्थापना सोहळा भक्तीमय वातावरणात आयोजित करण्यात येत आहे. पूजा विधी : ह.भ.प. तीरथ उपाध्य दादा महाराज, पु. बाराहाते (उज्जैन) यांच्या शुभहस्ते १२ मे रोजी, सकाळी ९ वाजता. पूजा स्थापना, सायंकाळी ५ वाजता. नगर भ्रमण यात्रा १३ मे रोजी, सकाळी ७ वाजता. प्राणप्रतिष्ठा पूजा: १४ मे रोजी, सायंकाळी ७ वाजता. प्रसाद वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी वस्तीतील सर्व भक्तांनी व सहकुटुंब उपस्थित राहून महादेवाचा आर्शिर्वाद घेऊन लाभ घ्यावा. हनुमान मंदिर, सन्मार्ग नगर १ हुडेकेश्वर येथे अखंड श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेच्या भावनेतून नियमित हनुमान चालीसा पठण व साप्ताहिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून युवकांमध्येही संस्कार व भक्तीची प्रेरणा जागृत होत आहे. दर आठवड्याला आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सामूहिक हनुमान चालीसा पठण, भजन, कीर्तन, आरती तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमामुळे अनेक भाविकांना मानसिक समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळत आहे. श्री हनुमान भक्तांच्या सहकार्याने व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला जात आहे.
सन्मार्गनगरात तीन दिवसीय नर्मदेश्वर शिवलिंग स्थापना सोहळ्याचे श्री हनुमान मंदिरात आयोजन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.