spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नांदगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भाजप समर्थित उमेदवार दीपक पडोळे ने 13 मतांनी काका बेनीराम पडोळे वर केली मात

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कडून दीपक पडोळे चे अभिनंदन

किशोर साहू , मौदा :- ग्रामपंचायत नांदगाव येथे सरपंच पदासाठी नुकतीच पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये भाजप समर्थित उमेदवार पुतण्या दीपक पडोळे यांनी काका बेनीराम पडोळे यांच्यावर 13 मतांनी मात केली. दीपक पडोळे यांना 326 मते. तर बेनीराम पडोळे यांना 313 मते मिळाली.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दीपक पडोळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. याप्रसंगी अरोली- कोदामेंढी जि प सर्कलचे भाजपचे क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुळे, नांदगाव येथील दीपक पडोळे यांचे समर्थक प्रकाश थोटे, रामेश्वर थोटे, ग्यानीराम सेलोकर ,पंकज हारोडे ,चंद्रशेखर सेलोकर, राधेश्याम पडोळे ,महेंद्र पडोळे, पराग खानोरकर, नीलकंठ पडोळे, सागर पडोळे, राहुल थोटे, मन्साराम खोब्रागडे, कैलास सहारे ,संदीप पडोळे, वीरेंद्र खोब्रागडे ,सुभाष झाडे, योगेश काटोके ,दिलीप थोटे, प्रवीण पडोळे, अक्षय थोटे, सुधाकर सहारे ,अनिकेत सेलोकर ,राजेंद्र पडोळे ,अनिकेत खोब्रागडे, गणेश भिवगडे ,आशिष थोटे, संदीप टेकाम, जितेंद्र सलामे प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.