spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अतिक्रमणधारकांची गय केली जाणार नाही

– ‘मिशन १०० डे’ अंतर्गत दैनंदिन कारवाईला अधिक गती देण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश

नागपूर :- शहरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवून पादचान्यांसाठी सुरक्षित व मोकळे मार्ग निर्माण व्हावा आणि शहरी शिस्त प्रस्थापित होऊन नागरिकांच्या जीवनमान अधिक उंचवावे याकरिता नागपूर महानगरपालिका द्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन १०० डे’ संदर्भात गुरुवारी(ता.१४) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयुक्त डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

बैठकीत शहरातील अवैद्य होर्डिंग सह फुटपाथ, विविध रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मुलनासाठी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील विविध भागांमध्ये अधिकृत फेरीवाले यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा मनपाद्वारे होणारी कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमणधारकांची गय केली जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. बैठकीत उपायुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, मंगेश खवले, गणेश राठोड, अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, हरीश राऊत, विजय थूल, विकास रायबोले, संजय कांबळे, सहायक पोलीस आयुक्त(वाहतूक) महेशकुमार ठाकूर, पीएमसीचे अजिंक्य देसाई, प्रसन्ना देसाई, सिद्धार्थ गोडबोले हे आभासी पद्धतीने उपस्थित होते.

मिशन १०० डे अंतर्गत मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयने शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कार्य केले जात आहे.

बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी एमआरटीपी कायद्यांतर्गत ज्या अवैध बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्या बांधकामांवर त्वरित पाडकामाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई तीव्र करतानाच, पर्यायी जागा शोधण्याचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. याशिवाय मनपाच्या पार्किंगच्या जागांचा वापर नेमका कशासाठी होतोय, याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत उपायुक्त मंगेश खवले यांनी सर्वप्रथम आजतागायत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सादर केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.