spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा बिगुल; 18 जूनला मतदान

– जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, प्रशासन सज्ज

हंसराज भंडारा :-  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सावन कुमार यांनी दिली.                                                                              निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विकास व्यवहारे यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ असून, अर्जांची छाननी २ जून रोजी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. 25 जून 2026 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या मतदारसंघात एकूण 31 कार्यरत स्थानिक प्राधिकारी संस्था असून, मतदारांची संख्या 457 इतकी आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या 4 राहणार असून, भंडारा जिल्ह्यात भंडारा व साकोली तर गोंदिया जिल्ह्यात गोंदिया व सडक अर्जुनी ही केंद्र आहेत.

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी भंडारा असून साहेब निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा मनोहर चव्हाण आणि निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया भैय्यासाहेब बेहेरे आहेत.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी सर्व संबंधितांना केले. आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता राजकीय पक्ष, स्थानिक संस्था आणि प्रशासनाने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.