spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान अंतर्गत पुरस्कारामध्ये रा.प. भंडारा विभागाची गगन भरारी

हंसराज, भंडारा :- ०१ एप्रिल-२०२५ ते ३१ मार्च-२०२६ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील संपुर्ण ‘अ, ब व क’ वर्गीय बसस्थकामध्ये “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबविण्यांत आला. या अभियानांतर्गत महाराष्ट्र व प्रादेशिक स्तरावरील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकाची पुरस्कारासाठी दि. २९/०५/२०२६ रोजी घोषणा करण्यांत आली आहे. या पुरस्कारामध्ये रा.प. भंडारा विभागाने भरारी मारली असुन महाराष्ट्र स्तरावरील एक पुरस्कार व प्रादेशिक स्तरावरील सहा असे तब्बल सात पुरस्कार भंडारा विभागाने मिळविले आहेत.

महाराष्ट्र स्तरावर ‘ब’ वर्गीय बसस्थानकामध्ये तिरोडा बसस्थानक, रा.प. तिरोडा आगार, भंडारा विभाग ९७ गुणांसह अव्वल ठरला असुन रू. ५०.०० लाख, फिरते चषक व प्रशस्तीपत्राचा मानकरी ठरला आहे.

प्रादेशिक स्तरावरील ‘अ’ वर्गीय बसस्थानकामध्ये साकोली बसस्थानक, रा.प. साकोली आगार, भंडारा विभागाने ८३ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला असुन रू. २.५० लाख व प्रशस्तीपत्राचा मानकरी ठरला आहे.

प्रादेशिक स्तरावरील ‘ब’ वर्गीय बसस्थानकामध्ये पहिल्या तिन्ही कमांकाची बक्षिसांचा मानकरी रा.प. भंडारा विभाग ठरला असुन प्रथम क्रमांक (९७ गुण) तिरोडा बसस्थानक, रा.प. तिरोडा आगार, द्वितीय कमांक (९७ गुण) लाखनी बसस्थानक, रा.प. साकोली आगार व तृतीय क्रमांक (९६ गुण) तुमसर बसस्थानक, रा.प. तुमसर आगाराने मिळविला असुन तिन्ही बसस्थानके अनुकमे रू. ५.०० लाख, फिरता चषक, प्रशस्तीपत्र, रू. २.५० लाख, प्रशस्तीपत्र व रू. १.५० लाख व प्रशस्तीपत्र चे मानकरी ठरले आहेत.

प्रादेशिक स्तरावरील ‘क’ वर्गीय बसस्थानकामध्ये प्रथम क्रमांक (९० गुण) देवरी बसस्थानक, रा.प. साकोली आगार तृतीय कमांक (८० गुण) लाखांदूर बसस्थानक, रा.प. पवनी आगाराने मिळविला असुन दोन्ही बसस्थानके अनुक्रमे रू. १.०० लाख, फिरता चषक, प्रशस्तीपत्र व रू. २५,०००.०० व प्रशस्तीपत्र चे मानकरी ठरले आहेत. अभियानांतर्गत पुरस्कारप्राप्त सर्व बसस्थानकावरील कार्यरत अधिकारी, पर्यवेक्षक व कर्मचारी/स्वच्छक यांचे अभिनंदन रा.प. भंडारा विभागातील सर्व अधिकारी वृंदाकडुन करण्यांत आले असुन भविष्यात पुन्हा उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन श्री निलेश शे. बेलसरे, विभाग नियंत्रक, रा.प. भंडारा विभाग यांचेकडुन करण्यांत आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.