spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महागाई व बेरोजगारी विरोधात डाव्या पक्षांचे निदर्शन

नागपूर :- देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि बिघडत चाललेल्या आर्थिक परिस्थितीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) आणि फॉरवर्ड ब्लॉक यांच्या संयुक्त विद्यमाने व्हरायटी चौक येथे निदर्शन करण्यात आले. या निदर्शनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ. युगल रायलू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अरुण लाटकर यांनी केले. यावेळी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करत महागाई आटोक्यात आणावी, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

निदर्शनात कॉ. गुरप्रीत सिंग, कॉ. मनोहर मुले, कॉ.रवींद्र पराते, कॉ. ईश्वर मसुरकर, कॉ.सुनील शेंडे, कॉ. शरद पिंपळे, कॉ. मारुती वानखेडे, कॉ. मोहन बावणे, विजय फुलकर, अंजली तिरपुडे, रामेश्वर चरपे, नरेश निमजे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. निदर्शना दरम्यान विविध घोषणाबाजी करून सरकारचे लक्ष सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Popular Articles