spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दीक्षाभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अवमानप्रकरणी कारवाईची मागणी

नागपूर :- महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस अजय चिकारा यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या “बेहतर नागपूर” या पोस्टरमध्ये पवित्र दीक्षाभूमीवर भगवा ध्वज दाखविण्यात आल्याचा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे चित्र उलट्या स्वरूपात छापण्यात आल्याचा आरोप मिशन बहुजनचे अध्यक्ष राकेश धारगावे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. राकेश धारगावे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, या कथित प्रकारामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, घटनेनंतर सहा दिवस उलटूनही काँग्रेस पक्ष किंवा नागपूरचे ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे.

धारगावे यांनी नितिन राऊत यांना उद्देशून काही प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणात त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित पोस्टर प्रकरणाची चौकशी करून अजय चिकारा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मिशन बहुजनच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये संबंधितांवर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करणे, काँग्रेस पक्षाने याबाबत भूमिका स्पष्ट करणे आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध पक्षांतर्गत कारवाई करणे यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात ४८ तासांच्या आत योग्य कारवाई व स्पष्टीकरण न मिळाल्यास मिशन बहुजनच्या वतीने नागपूर येथे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राकेश धारगावे यांनी दिला आहे.

Popular Articles