spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मान्सूनच्या तोंडावर; नाल्यांची सफाई केव्हा!

कामठी :- मान्सून सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहला आहे असे असतानाही आतापर्यंत कामठी शहरातील बहुतांश नाले व नाल्याच्या साफ सफाईचे काम सुरू झाल्याचे दिसून आले नाही .दरवर्षी पावसाळ्या पूर्वीच नगर परिषद च्या माध्यमातुन नाले,नाल्या आणि पावसाच्या पाण्याचा निपटारा होण्याच्या अनुषंगाने स्वच्छता अभियान राबविला जातो मात्र अद्यापपर्यंत कामठी शहरातील बहुतांश नाल्याची स्वच्छतेचे चित्र नागरिकांना दिसून आले नाही. यंदा जुन महिन्याची सुरुवात झाली तरीही शहरातील मोठ्या नाल्यांची प्रभावी सफाई करण्यात नसल्याचे चित्र आहे.या नाल्यातून परिसरातील सांडपाणी वाहतो या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कचरा ,गाळचा साठा झालेला आहे परिणामी सांडपाणी निचऱ्यात अडथळा निर्माण होत आहे.त्यातच पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होऊन थेट नाल्याचे सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसणार आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचाही त्रास सहन करावा लागणार आहे.नाल्यांची वेळेत सफाई न झाल्यास डासांचे प्रमाण वाढून साथीच्या रोगाचा धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा नगर परिषद प्रशासनाने तातडीने नाले व नाल्यांची साफसफाई करून संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बॉक्स -कशामुळे निष्फळ ठरतेय नालेसफाई?केवळ नाल्यातील कचरा वर वर काढणे म्हणजे नालेसफाई नव्हे तर नाल्यात असलेला वर्षानूवर्षाचा गाळ आणि प्लास्टिक काढणेही आवश्यक आहे.मात्र अनेकदा केवळ वरवरची स्वछता करून देयकाची उचल केली जात असल्याचा प्रकार कामठी नगर परिषदेत दिसून येत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.