spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अरोली ते कन्हान, रेवराल ते धानला रस्ता दुतर्फा लावलेली झाडे संगोपन अभावी 50% च्या वर मृत पावले, हर्ष व अभी कन्स्ट्रक्शन कंपनीचे दुर्लक्ष 

किशोर साहू, मौदा :- अरोली ते कन्हान सिमेंट रस्ता बांधकाम करणाऱ्या हर्ष कन्स्ट्रक्शन कंपनीने, तर रेवराल ते धानला सिमेंट रस्ता बांधकाम करणाऱ्या अभि कन्स्ट्रक्शन कंपनीने यंदा पावसाळा संपता संपता पावसाळ्याच्या शेवटच्या सप्टेंबर महिन्यात रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड केली. मात्र संगोपनाकडे दोन्ही कंपन्यांचे अक्षम्य दुर्लक्षामुळे काही झाडे पाण्याअभावी, काही झाडे संगोपन अभावी, तर काही झाडे वनवा लावण्यापूर्वी झाडाचे संरक्षण करण्यासाठी दोन्ही कंपन्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यामुळे वरील दोन्ही रस्त्याचे रस्ता दुतर्फा लावलेले झाडे 50% च्या वर मृत झालेली आहे.

जोपर्यंत या दोन्ही रस्त्यांचे रस्ता दुतर्फा लावण्यात आलेली झाडे शंभर टक्के जगत नाही तोपर्यंत संबंधित विभागाने व प्रशासनाने या दोन्ही कंपन्यांचे वृक्ष लागवडीसह इतरही दिले देयके थांबविण्यात यावे अशी मागणी , रेवराल, धानला, अरोली, कन्हान परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर केली आहे.

Popular Articles