– पर्यावरण दिनी संत तुकाराम उद्यानात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
नागपूर :- जगद्गुरु संत तुकाराम उद्यान, रेशीमबाग मित्र परिवार तर्फे जागतिक पर्यावरणा दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण, आरोग्य शिबीर व नागरिक परिचय मेळावा कार्यक्रम सोहळा काल शुक्रवारी संत तुकाराम उद्यान, रेशीमबाग येथे लोकसहभागातून अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील काशीकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून नंदनवन भाग संघचालक अशोक बुजोणे, लोकजागृती मोर्चा चे अॅड.रमण सेनाड, डॉ.लीना निकम, डॉ दीप्ती खानोरकर, ज्येष्ठ प्रचारक श्रीकांत देशपांडे, द्वारकाप्रसाद शर्मा, सुरेंद्र होरे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत गार्डन मध्ये अनेक वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रत्येक परिवारातील प्रतिनिधीला वृक्ष संवर्धनाची जबाबदारी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सक्षम महानगर अध्यक्ष डॉ.मिलिंद हरदास यांनी केले. यावेळी डॉ. खानोरकर यांनी योग साधनेचे, महत्त्व विशद केले. पर्यावरणाचे महत्त्व विशद करताना लेखिका डॉ. लीना निकम म्हणाल्या की ‘विकासाच्या नावावर जी वृक्षतोड होते आहे की अतिशय वाईट आहे. पुढच्या पिढीला तुम्ही काय देणार? त्यांना तुमची संपत्ती नको, पैसा नको तर त्यांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि हिरवी पृथ्वी हवी ही गोष्ट ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणजे वृक्षाशी नाते जोडा हे संत तुकाराम महाराज सांगून गेले. आरमारासाठी आणि गडकिल्ल्यांसाठी लाकडाची गरज होती तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्षतोडीवर मर्यादा आणल्यात. त्यांना पर्यावरणाचे महत्त्व तेव्हाच कळले होते. या महापुरुषांचा वारसा आपण जपू या’ सभापती ज्योती देवघरे, नगर सेवक चंद्रकांत खंगार, मानसी सिमले,सारिका चिंचमलातपुरे, अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष डॉ श्रीर॑ग वराडपा॑डे,भाजप हनुमान मंडळ महामंत्री नीतीन सिमले, डॉ अविनाश वासे, विदर्भ दैनिक युवक रोजगार च्या संपादिका ज्योत्स्ना करवाडे, केशव प्रभात शाखा स्वय॑सेवक, सनातन सांस्कृतिक कला व क्रीडा परिषद तर्फे झाडे वितरण करण्यात आले,सर्व कार्यकर्ते, रेशीमबाग मित्र परिवार, जगदंबामाता देवस्थान,योगाभ्यासी म॑डळ यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप वाघ, अनंत बैतुले,रमेश महाजन,अतुल तिजारे ,प्रवीण घुले,प्रदीप मरोतकर,दत्तराज श्रीरंग, श्रीकांत इरुटकर,आनंद पांढरे आणि संपूर्ण टीमने कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे नेटके संचालन श्री सुधीर सांगोळे यांनी केले. प्रत्येकाला वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले हे विशेष.








