spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विश्व पर्यावरण दिनानिमित्त कामठीत भाजपच्या वतीने वृक्षारोपण

कामठी :- विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमांतर्गत कामठी शहरातील हुतात्मा स्मारक तसेच सिंहासन के बालाजी मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री अनिल निदान, रिंकेत चवरे, शुभांगी गायधने, शहराध्यक्ष मंगेश यादव, येरखेडा नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर “मोदी सरकार के 12 साल बेमिसाल” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी मनोज चौरे, विवेक मंगतानी, डॉ. संदीप कश्यप, राज हाडोंती, नगरसेवक इशांत ठाकूर, दिलीप बांडेबुचे, विनोद वाधवानी, योगेश गायधने, विवेक मंगतानी , चंद्रशेखर तुप्पट, कमल यादव, राज हाडोती, राजेश खंडेलवाल, डॉक्टर संदीप अशोक, उज्वल रायबोले, अथर्व पिंगळे, विजय कोंडुलवार,नितीन रावेकर, नंदा बाराई , श्रावण केळझरकर, अभिलाष यादव, विनोद संगेवार, नरेश कलसे, नरेश पारवानी, प्रतीक पडोळे, बरकत अली, प्रभा राऊत, रेखाताई झंझाड, पल्लवी डोंगरे, दिनेश शरण, सीरिया, नरेश खोकरे, धीरज सोलंकी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Popular Articles