spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सी.पी.अँड बेरार ई.एस. महाविद्यालयात एमबीए अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात

नागपूर :- सी.पी.अँड बेरार ई.एस.कॉलेज, रविनगर येथील महाविद्यालयाच्या सभागृहात व्यवसाय व्यवस्थापन विभागाच्या 2024-26 या शैक्षणिक सत्रातील अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात विभागाचे समन्वयक प्रा. एस.डी.भावे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासातील कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विभागाचे प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी डॉ. आशिष लिंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्याच्या पुढील टप्प्यात आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन यश संपादन करण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, गायन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शैक्षणिक आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. प्रवीण बागडे, प्रा.आरती जोशी आणि सचिन खिरे यांची विशेष उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या आठवणी, अनुभव आणि भावनिक मनोगतांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरणात हा निरोप समारंभ संपन्न झाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.