किशोर साहू, मौदा :- सोमवार (ता.15 जून) ला पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून श्री श्री फाउंडेशन तर्फे धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या भजन मंडळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तारसा-धामणगाव जि प क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या आजनगाव, माथणी, मांगली (चांदे) येथे भजन साहित्याचे वाटप करण्यात आले.
भजन साहित्य वाटपामध्ये परमपूज्य परमात्मा एक बाल सेविका भजन मंडळ आजणगाव,जय हनुमान भजन मंडळ, माथनी,हनुमान भजन मंडळ, मांगली (चांदे) या मंडळांच्या समावेश आहे.
या प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य वीरेंद्र पायतोडे, आजणगाव सरपंच चिंतामण सारवे,मंगेश तिघरे, आजणगाव, मांगली (चांदे) व माथनी येथील भजन मंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
समाजातील धार्मिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांमुळे भजन परंपरेला नवे बळ मिळत आहे, असे प्रतिपादन पायतोडे यांनी याप्रसंगी केले.








