spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सासन रामापूर शाळेतील समस्या व TET पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिक्षणमंत्र्यांना आ.रवी राणा यांचे युवा स्वाभिमान कडून निवेदन

अमरावती :- तारीख २८ जून,२६ रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार पंकज भोयर हे अमरावती येथे आले होते.दौऱ्यादरम्यान एचएससी बोर्डाच्या बैठकीच्या निमित्ताने विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने कार्यालय सचिव उमेश ढोणे यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात मंत्र्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात दर्यापूर तालुक्यातील सासन रामापूर येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेच्या आवारात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने लहान विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठा त्रास होत असल्याचे नमूद करण्यात आले. या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सन 2022 मध्ये कोरोना संसर्गाच्या काळात जीवाची पर्वा न करता राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देऊन 90 टक्के गुण मिळविणाऱ्या पात्र उमेदवारांना शासकीय सेवेत संधी देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, जिल्हा शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, एचएससी बोर्डाचे अध्यक्ष तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles