spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आमदार राजीव पोतदार यांचे हस्ते कन्हान येथे ‘पल्स पोलिओ अभियान २०२६’ चा शुभारंभ

– रायनगर येथुन अभियानाला प्रारंभ; पालकांनी बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावे. 

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत रविवार (दि.२८) जुन ला ‘पल्स पोलिओ अभियान २०२६’ चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. रायनगर येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले.

यावेळी आमदार डॉ. पोतदार यांनी स्वतः लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजुन राष्ट्रीय अभियानाची सुरुवात केली. त्यांनी उपस्थित पालकांना आवाहन करताना, “बालकांचे आरोग्य जपुया, पोलिओ मुक्त भारत घडवुया” असा संदेश दिला . तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला जवळच्या पोलिओ केंद्रावर नेऊन लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच आरोग्य विभागाने अभियानासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केली असुन नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवुन आपल्या पाल्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे, मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंह, गटनेता मनोज कुरडकर, नगरसेवक शक्ती पात्रे, प्रशांत पाटील, नगर सेविका प्रियंका बैस, पूनम राठी, सुचित्रा माटे, प्रतिक्षा चवरे, लक्की ठाकुर, आशा वर्कर वंदना शेंडे, स्वप्निल नितनवरे, प्रविण गोडे, रिषिकेश चवरे आदी सह प्रामु ख्याने नगरसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्म चारी तसेच बहु संख्येने नागरिक आणि पालक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.