spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलिसांची कारवाई; तब्बल ३५ लाख रुपयांचा गांजा सह कार जप्त

– देवलापार पोलिसांची कारवाई, आरोपी फरार 

रामटेक :- ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रामटेक तालुक्यातील देवलापार हद्दीत सराईत कार मधून १२५ किलो ६६५ ग्रॅम वजनाचा गांजा व गांजा तस्करी करण्यासाठी वापरलेली होंडा सिटी कार हस्तगत करून एकुण ३५ लाख २३ हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात (दि.२६) जुन रोजी पहाटे २ च्या सुमारास पोलीस ठाण्यासमोर नाकेबंदी करण्यात आली होती. संशयित सिल्व्हर रंगाच्या होंडा सिटी कार जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने पोलिसांना चकवा देत वाहन भरधाव वेगाने पळविले. पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला. मात्र मनेगाव टेक परिसरात चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून लॉक केली आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळ काढला. पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता डिकीत १२६ पॅकेटमध्ये १२५ किलो ६६५ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २५ लाख २३ हजार ३०० रुपये, तर होंडा सिटी कारची किंमत १० लाख रुपये असून एकूण ३५ लाख २३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी देवलापार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरु आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे व देवलापार पोलीस पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.