spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लाखनीच्या वाघाये महाविद्यालयात ‘आरक्षणाचे जनक’ राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आरक्षणाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतींना यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन का. प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रारंभी डॉ. गणेश कापसे यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण केले.

याप्रसंगी डॉ. पुण्यशील टेंभुर्णे, डॉ. सिंघ, डॉ. सुधाकर शेंडे, डॉ. यू.पी. शहारे, डॉ. सुधीर सहारे, डॉ. बाबन डोंगे, प्रा. प्रमोद भोयर, प्रा. सागर वारंगणे, प्रा.डोंगरवार, डॉ. टिचकुले आणि प्रा. वलथरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच मंगेश भांडेबुचे, विजय शहारे, अंबादास कुंभरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमातून शाहू महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.