spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माय फाउंडेशन व माय ग्रुप तर्फे स्थापना दिनानिमित्त भव्य समाजसेवा उपक्रम उत्साहात संपन्न

नागपूर :- आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या स्थापना दिनानिमित्त ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माय फाउंडेशन, माय ग्रुप आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश्वर पार्क, बेसा, मनीषनगर येथे भव्य समाजसेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदाब व रक्तातील साखरेची तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी, गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण तसेच होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टरां मार्फत सात दिवसांच्या मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला माय फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष डॉ. मोतीलाल चौधरी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत महासचिव यजेंद्रसिंह ठाकूर, माय फाउंडेशनच्या सचिव ॲड. रुबी चौधरी, पवार कृती समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले, डॉ. रामचंद्र दुबे, बेसा-पिपळा नगरपंचायत बांधकाम समितीचे सभापती मुकेश काळे, फॉर्च्युन असोसिएशनचे सचिव सुनील यारावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सकाळी १० वाजता राजेश्वर पार्क येथे आंबा, जांभूळ, बोर, चिकू व जांभूळ (रोज ॲपल) आदी फळझाडांचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी ३.३० या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिरात सुमारे २७ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले, तर अनेक गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचा सुमारे ४०० नागरिकांनी लाभ घेतला. भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.डी. राऊत, नॅशनल लेबर युनियनचे अध्यक्ष विजय पाटले, प्रा.सुरेंद्र मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून डॉ. मोतीलाल चौधरी यांना वाढदिवसानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. मोतीलाल चौधरी यांनी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असल्याचे सांगितले. वयाच्या १९ व्या वर्षापासून ते नियमित रक्तदान करत असल्याचे त्यांनी नमूद केले. रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे सांगत त्यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. त्यांच्या प्रेरणेने सुमारे २७ जणांनी रक्तदान केले. तसेच १०० हून अधिक गरजू नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात आले. शिबिरात आयुष ब्लड बँकेचे डॉ. संजय बारागावणे, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. पूजा तुरकर (पटले), दंतचिकित्सक डॉ. वृंदा कोल्लारकर तसेच स्व.भानुताई गडकरी नेत्र चिकित्सालयाचे डॉ. लाहाने यांनी वैद्यकीय सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बोपचे, शिवा पारधी, सुरेश तेंभरे, उमेश महंत, विलास डिग्रेस, राहुल क्षीरसागर, हिरालाल पराडकर, ओडा दाखणे, राजेश तेजकर, शिरीष पाठक, जैलाल पाटले, पूनम नाले, प्रदीप नाले, सूर्यकांत राजे, सुभाष पाटले, श्रीकृष्ण तळेगावकर, श्रीहरी चौधरी, मोतीलाल पाटले, संजय ठाकरे, रिया रामटेके, मल्हार, प्रद्योत पाटले, अथर्व चौधरी, प्रसन्न चौधरी, हर्षाली सेलोटी, राहुल, मोहन गोरे यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Popular Articles