spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारसा येथे उद्या नि:शुल्क महाआरोग्य शिबिर

किशोर साहू, मौदा :- ग्रामीण भागातील गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवा विस्तार अभियान अंतर्गत श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या वतीने मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याने रविवार (ता. 5 जुलै ) सकाळी ९:३० ते २ वाजेपर्यंत श्री साईश्वर ग्रँड हॉल, तारसा येथे निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी, सल्ला, औषधोपचार तसेच आवश्यक शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

रक्तदाब, शुगर, रक्त तपासणी, ईसीजी इत्यादी सुविधा उपलब्ध राहतील. नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयरोग, कान-नाक-घसा, जनरल मेडिसीन, दंतरोग, कॅन्सर व इतर विविध विभागांची सुविधा सुद्धा उपलब्ध राहणार आहे. या शिबिरात महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहे.तरी या महाआरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles