spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त निमा नागपूर तर्फे सत्कार व सीएमई सत्राचे आयोजन रविवारी

नागपूर :-  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) नागपूर शाखेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त रविवारी, ५ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता. नंदनवन येथील केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांचा सत्कार व विशेष सीएमई (सतत वैद्यकीय शिक्षण) प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद मुंडडा हे “उच्च रक्तदाब आणि त्याचे व्यवस्थापन” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला निमा केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांसह नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन कान्होलकर, सचिव डॉ. शरद ठाकूर, कोषाध्यक्ष डॉ. पंकज थूल व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या विशेष कार्यक्रमाला नागपूर व परिसरातील सर्व आयुष व एकात्मिक वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमा नागपूर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles