नागपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे देवडिया काँग्रेस भवन, महाल येथे ओबीसी कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे होते. यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे, एआयसीसी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय समन्वयक अजय हटेवार, काँग्रेस नेते गिरीश पांडव, माजी महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे तसेच एआयसीसी ओबीसी विभागाचे महाराष्ट्र समन्वयक रामरतन पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात नागपूर विभागातील नवनियुक्त शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षांचा नागरी सत्कार करण्यात आला. यामध्ये नागपूर शहराध्यक्ष प्रफुल गुडघे, वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, गोंदिया जिल्हाध्यक्ष अमर वराडे आणि गडचिरोली जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचा गौरव करण्यात आला. तसेच ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या नागपूर महानगर पालिकेतील नगरसेवकांचाही सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विदर्भातील ओबीसी विभागाच्या संघटन विस्तारासाठी नागपूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, नागपूर (शहर) अध्यक्ष प्रशांत पवार, वर्धा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण माऊसकर, भंडारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत येरपुडे, भंडारा (शहर) अध्यक्ष जीवन कावळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष उमाकांत धांडे, गोंदिया जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे आणि गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष मनोज ढोरे यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश, विभाग, शहर व जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच ओबीसी विभागाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय भिलकर, चंद्रकांत हिंगे, सचिन निंबार्ते, भूषण तल्हार, विजया धोटे, संध्या बिसेन, विजया गोरे, वीणा जंजाड, सुनीता जिचकार, उमाकांत धांडे, मनोज ढोरे, श्रीकांत धोटे, माधवराव गावंडे, रमेशमामा राऊत, प्रमोद शिंगणे, संतोष गोटाफोडे, अरविंद क्षीरसागर, आशिष काळे आणि शिवम पलांदुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
ओबीसी विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार, नियुक्तीपत्रांचे वितरण









