spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा येथे बाल धम्म संस्कार वर्गाच्या तिसऱ्या सत्राचा शुभारंभ मैत्रेय बुद्ध विहारात मुलांवर नैतिक मूल्ये आणि आंबेडकरी विचार रुजविण्याचा संकल्प

हंसराज,भंडारा :- भंडारा येथील नाशिक नगरमधील मैत्रेय बुद्ध विहार येथे बाल धम्म संस्कार वर्गाच्या तिसऱ्या वर्षाच्या बॅचचा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अर्मुत बन्सोड, शैलेश मेश्राम, प्रशांत देशभ्रतार, अंजिरा नागदेवे आणि उपस्थित पालकांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजविण्यासोबतच त्यांच्यात शिस्त, नैतिक मूल्ये, दानभावना आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी वर्गाचे शिक्षक जयदीप बागडे, पिंकी उके, संचिता बोरकर, वैशाली गणविर आणि भूपेश शेंडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत देशभ्रतार, जयदीप बागडे आणि पिंकी उके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा व अर्पण विधीने करण्यात आली. यानंतर उपस्थित बालकांना जलेबी, समोसा आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमरदीप बोरकर, अक्षय वाहणे, शुभम चिंचोलकर, अतुल भैसारे, अजय देशपांडे, माया बागडे, सुशीला मडामे, सुशीला शहारे, मैत्रेय बौद्ध महिला मंडळ आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Popular Articles