spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान-पिपरी विकास आराखड्यातील आरक्षित जागा पुनर्स्थापित करा

– अन्यथा काँग्रेसचे तीव्र आंदोलन.

कन्हान :- नगरपरिषद कन्हान-पिपरी विकास आराखड्यात स्टेडियम व प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा आरक्षणातुन वगळण्यात आल्याच्या तसेच स्मशान भूमीसाठी मंजुर झालेल्या १.२० कोटी रुपयांच्या निधीचा वापर अद्याप न झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवार (दि.६) जुलै ला कन्हान नगरपरिषदेत धडक देत नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

रामटेकचे माजी खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे व मुख्याधिकारी दीपक घोडके यांच्याशी चर्चा करून कन्हानच्या भविष्यातील विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली स्टेडियम व प्राथमिक शाळेची जागा पुन्हा आरक्षणात समाविष्ट करावी किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच संबंधित जागेचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली.

यावेळी स्मशान भूमीच्या बांधकामासाठी मागील वर्षी मंजुर झालेल्या १.२० कोटी रुपयांच्या निधीचा आज पर्यंत वापर का करण्यात आला नाही, असा थेट सवाल नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आला. यावर नगराध्यक्षांनी या विषयाचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेण्या चे आश्वासन दिले. मात्र स्टेडियम व शाळेसाठीचे आरक्षण कायम करण्यात आले नाही किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही, तर कन्हान च्या विकासाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला.

यावेळी काँग्रेसच्या गटनेत्या रेखा टोहणे, नगरसेवक समशेर पुरवले, नगरसेविका निती तेलोते, माजी उपाध्यक्ष योगेंद्र बाबु रंगारी, माजी नगराध्यक्षा करुणा आष्ठणकर, शेखर पडोळे, माजी सरपंच बळवंत पडोळे , माजी नगरसेवक विनय यादव, मनिष भिवगडे, राखी परते, दर्शना तिडके, प्रशांत मसार, गौरव माहोरे, अर्जुन पात्रे, सिद्धू ढोके, प्रविण गोडे, प्रदिप बावणे, अमोल प्रसाद, गणेश भालेकर, संदीप परते, सतिश पाली, शेखर बोरकर, दीपकजी शर्मा, निंबा केवट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.