spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वस्तिका ललित हरोडे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

नागपूर :- ग्रेट ब्रिटेन इंग्लिश प्रायमरी स्कूल, नागपूर येथील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी स्वस्तिका ललित हरोडे हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (फेब्रुवारी २०२६) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळविली. या यशाबद्दल शाळेच्या संचालिका विजयश्री ठोबरे, संचालक मुकुंद ठोबरे, मुख्याध्यापिका इशरत जहाँ तसेच शिक्षिका कल्याणी फंदे, मेघा बावरिया आणि अश्विनी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्वस्तिकाच्या यशामागे तिची मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास, कुटुंबाचे प्रोत्साहन आणि शाळेचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तिची आई रूपा पंडित हरोडे या ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी लहानपणा पासूनच स्वस्तिकामध्ये अभ्यास व सामान्य ज्ञानाची आवड निर्माण केली. स्वस्तिकाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles