spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धार्मिक अर्थव्यवस्था भारताच्या सर्वसमावेशक विकासाचा भक्कम आधार – तज्ज्ञ

नागपूर :- स्वाधीनता ग्राम विकास अँड पीस फाउंडेशनतर्फे नागपुरात “धार्मिक अर्थव्यवस्था अभ्यास सत्र” आयोजित करण्यात आले होते. या सत्रात राष्ट्रिय अर्थतज्ज्ञ सीए शेताली ठाकरे यांनी धार्मिक अर्थव्यवस्थेचा भारताच्या आर्थिक व सामाजिक विकासातील महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला. कार्यक्रमाला कॅट (CAIT) चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए बी. सी. भारतीय, वास्तुविशारद अभिषेक देशपांडे तसेच मंत्री आशीष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आशीष जयस्वाल यांनी ग्रामीण व धार्मिक अर्थव्यवस्था ही भारताच्या सर्वसमावेशक विकासाची भक्कम पायाभरणी असल्याचे सांगितले. या क्षेत्रांचा अभ्यास, संवर्धन आणि धोरणात्मक विकास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सीए श्वेताली ठाकरे यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार भारताची धार्मिक अर्थव्यवस्था सुमारे २० लाख कोटी रुपयांची असून ती देशाच्या जीडीपीच्या जवळपास ४ टक्के आहे. या क्षेत्रामुळे सुमारे २.५ कोटी नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत असून लघु व्यापारी, फेरीवाले, कारागीर, वाहतूक, पर्यटन, आदरातिथ्य सेवा आणि ग्रामीण उद्योजक यांना त्याचा मोठा लाभ होत आहे. त्यामुळे धार्मिक अर्थव्यवस्थेचे शास्त्रीय मोजमाप व अभ्यास करण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीए बी.सी.भारतीय यांनी महाकुंभ हे भारतीय परिपत्र अर्थव्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले. अशा धार्मिक आयोजनांमुळे लाखो लघु व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वास्तुविशारद अभिषेक देशपांडे यांनी पिंटू कोळी यांच्या उदाहरणाचा उल्लेख करत महाकुंभ काळात त्यांच्या व्यवसायाची जवळपास ३० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या यशाचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. भारताच्या स्वदेशी आर्थिक मॉडेलचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. समारोपात सीए शेताली ठाकरे यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) प्रमाणे रिलिजियस सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (RSR) ही संकल्पना मांडली. धार्मिक संस्थांमध्ये सुशासन, पारदर्शकता, विश्वास आणि सामाजिक सलोखा वाढवून सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी अशा चौकटीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या अभ्यास सत्रात समीर कुलकर्णी, आदित्य व्यास, अनुप हुद्दार, नरेश अरसाडे, उमेश धोटे, किशोर धाराशिवकर, सीए आर. के. गनेरीवाला, सीए सुमन अग्रवाल, सपना तलरेजा, पूजा झाम आणि राखी ठाकूर यांच्यासह अनेक अभ्यासक, उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Popular Articles