– राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची – अरुण नेटके
यवतमाळ :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त यवतमाळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवहुंकार युवा संमेलन’ ला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता नंदूरकर विद्यालय, यवतमाळ येथे हे भव्य संमेलन पार पडले. कार्यक्रमस्थळी भारत मातेच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले होते.
या संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून अरुण नेटके केंद्रीय सहमंत्री, मठ-मंदिर अर्चक पुरोहित, संपर्क प्रमुख, विश्व हिंदू परिषद यांनी युवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणातून राष्ट्रउन्नतीसाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. तसेच, हिंदू संस्कृतीचे जतन, परंपरांचे पालन आणि उत्सवांच्या माध्यमातून हिंदुत्व जिवंत ठेवण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाद इंगोले युवा चार्टर्ड अकाउंटंट, जिल्हा संघचालक विलास देशमुख, नगर संघचालक धनंजय पाचघरे आणि जिल्हा कार्यवाह महेश धनरे यांची उपस्थिती लाभली.
या संमेलनात बौद्धिक, शारीरिक, चर्चा व संवाद अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. संघाचे कार्य, कार्यपद्धती आणि राष्ट्रसेवेचे मूल्य युवकांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमात सांघिक गीत शुभम जाधव यांनी सादर केले, तर सूत्रसंचालन निखिल गाडवे यांनी केले. सुभाषित तरंग दुर्लारवार यांनी सादर केले, तर प्रार्थना अथर्व कठाने यांनी म्हटली.
या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.संमेलनात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते, राष्ट्रभावनेचा संदेश या संमेलनातून देण्यात आला.








