spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोदामेंढीत रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न

किशोर साहू, मौदा :- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपा मौदा तालुक्याच्या वतीने कोदामेंढी येथे गर्देश्वरी मंदिर परिसरात भव्य रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.शिबिरात २० रक्तदानदात्यांनी रक्तदान केले .

याप्रसंगी भगवान बावनकुळेभाजपा मंडळ अध्यक्ष मौदा तालुका, मोरेश्वर सोरते भाजपा शहर अध्यक्ष मौदा , प्रसन्ना (राजा) तिडके,नगराध्यक्ष नगरपंचायत मौदा, नरेश मोटघरे तालुका समन्वय समिती अध्यक्ष तथा भाजपा प्रभारी मौदा ,बंटी हटवार भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष मौदा,नरेश बावनकुळे तालुका समन्वय समिती सदस्य मौदा ,गोपाल गिरमेकर उपसरपंच ग्रामपंचायत कोदामेंढी,राहुल पोटभरे नगरसेवक नगरपंचायत मौदा,  मुकेश अग्रवाल माजी भाजपा तालुका अध्यक्ष मौदा,राधा अग्रवाल माजी जि.प. सदस्य, रेवा देशमुख सरपंच  बेरडेपार, विशाल सेलोकर सरपंच बोरी (घिवारी), अमित तिल्लीखेडे उपसरपंच ग्रामपंचायत धानोली,  प्रविण कारेमोरे नीलेश बावनकुळे,चंद्रशेखर जाधव, विनोद मदनकर, स्वरूप गहेरवार,अंकित वाडिभस्मे, राहुल हटवार, निखिल बडवाईक, गुड्डू पाथुरकर, सौरभ खरवडे तसेच मौदा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून अनेक रक्तदान दात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आयोजकांनी रक्तदानदात्यांचे मनापासून आभार मानले.

Popular Articles