spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सत्रापुर लेबर कॅम्प येथील जुगार अडयावर पोलिसांची धाड

– १० दुचाकींसह ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कन्हान :- पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेला वेग देत सत्रापुर येथील लेबर कॅम्पवर धाड टाकुन जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्या ताब्यातुन १० दुचाकी, चार मोबाईल फोन, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकुण ४ लाख २० हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवार (दि.२२) जुलै ला कन्हान पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करित असताना मौजा सत्रापुर येथील लेबर कॅम्प मध्ये काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावुन हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकली. या कारवाईत देवानंद शामराव कुरमनकर वय २७ वर्ष, रा. बोरडा, निरज राकेश तिवारी वय ३४ वर्ष, रा. पिपरी-कन्हान, मोहन महादेव शिवणकर वय २९ वर्ष, रा. पिपरी-कन्हान, कशीस कमल खडसे वय २३ वर्ष, रा. सत्रापुर, निहाल मोरेश्वर मेश्राम वय २४ वर्ष, रा. नया गोदाम कामठी आणि सारंग कार्तिक कुथे यांना जुगार खेळताना पकडण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून १० मोटारसायकली, चार मोबाईल फोन, रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकुण किंमत ४ लाख २० हजार ३८० रुपये इतकी आहे. संबंधितां विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्श नात करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या नेतृत्वात पोउपनि मरकट, पोहवा नरेश बाटबरई, पोना अनिल यादव, पोशि आकाश सिरसाट, नवीन पाटील, जीवन विघे आणि राहुल जाधव यांनी यशस्विरित्या कारवाई पार पाडली.

Popular Articles