spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दोन दिवसाच्या सततधार पावसाने नाल्यावर नवीन पूल बांधकाम करण्याकरता बनविण्यात आलेला पर्यायीपूल वाहला 

किशोर साहू, मौदा :- मागील एक वर्षापूर्वी पासून अरोली-पारडीकला-निमखेडा-भेंडाळा-आजनगाव-मौदा या रस्त्याचे सिमेंट करण सुरू असून, खापरखेडा (तेली ) ते पारडीखुर्द दरम्यान नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहनधारकांना रहदारीकरिता करिता पर्यायी पूल बनविण्यात आला होता. मात्र मागील दोन दिवसापासून सततधार पाऊस येत असल्याने मौदा तालुक्यातील नदी नाले वाहू लागले आहे व त्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे खापरखेडा तेली ते पारडी खुर्द दरम्यान नाल्यावरील वाहनधारकांसाठी बनविण्यात आलेला पर्यायी पूल आज बुधवार (ता. 22 जुलै ) रोजी वाहून गेला. त्यामुळे या मार्गावर वाहतूक बंद झालेली आहे.

Popular Articles