किशोर साहू, मौदा :- बुधवार (ता. 22 जुलै) रोजी ग्रामपंचायत कार्यालय राजोली येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला पूजाअर्चना ,माल्यार्पण व त्यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच योगेश महादुले ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पोटभरे ,ग्रामपंचायत अधिकारी अंकिता चकोले ,जि प शाळेचे मुख्याध्यापक नकोरिया, अंगणवाडी सेविका महादुले, ग्रामपंचायत कर्मचारी जितेंद्र तांडेकर, संगणक परिचालक लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
ग्रामपंचायत धनी, विरसी , भेंडाळा सह मौदा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी केल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वृत्तपत्र वाटप करत असताना कार्यक्रमाची फोटो दाखवून सांगितले.





