spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान मध्ये जख्मी राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान

– नगरसेवक समशेर पुरवले यांच्या पुढाकाराने वन विभागाकडे सुपुर्द

– लक्ष्मी-विष्णु नगर परिसरातील प्रसंग ; उपचारा साठी नागपुरला रवाना

कन्हान :- शहरातील प्रभाग क्र.३ अंतर्गत लक्ष्मी-विष्णु नगर परिसरात गुरुवारी (दि.२३) जुलै ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जख्मी अवस्थेत राष्ट्रीय पक्षी मोर आढळुन आला. जख्मी मोरावर काही भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. मात्र नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि नगरसेवक समशेर पुरवले यांच्या तातडीच्या हस्तक्षेपा मुळे मोराचे प्राण वाचविण्यात यश आले.

समीर कालीचरण पुरवले यांनी जख्मी मोरावर कुत्रे हल्ला करत असल्याचे पाहताच धाडसाने त्याची सुटका केली. त्यानंतर त्यांनी त्वरित नगरसेवक समशेर पुरवले यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच समशेर पुरवले यांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाशी संपर्क साधुन मदत मागवली. वन विभागाचे राऊंड ऑफिसर निलेश चव्हाण व त्यांच्या रेस्क्यु पथकाने घटनास्थळी पोहोचुन जख्मी मोराला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासणीनंतर पुढील उपचारासाठी मोराला नागपुर येथे वन विभागाच्या रेस्क्यु टीम मार्फत रवाना करण्यात आले. यावेळी विनोद पात्रे, शेखर बोरकर तसेच लक्ष्मी-विष्णु नगर परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. राष्ट्रीय पक्ष्याचे प्राण वाचविण्यासाठी नागरिकांनी दाखविलेली तत्परता आणि वन विभागा च्या त्वरित प्रतिसादाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Popular Articles