spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हुडकेश्वर-नरसाळा परिसराची महापौरांकडून पाहणी

– नागरिकांशी साधला थेट संवाद

नागपूर :- हुडकेश्वर-नरसाळा एसटीपी (STP) प्लांट परिसरातील नाल्यावरील पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. तसेच पावसाचे पाणी साचल्यामुळे परिसरातील काही घरांमध्येही पाणी शिरल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

महापौरांसोबत उपमहापौर लिला हाथीबेड, झोन सभापती ज्योती देवघरे, अग्निशमन विशेष समिती सभापती रुपाली ठाकूर, नगरसेवक मडावी तसेच सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.

पाहणीदरम्यान महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नाल्यावरील पुलावरील वाहत्या पाण्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीची सुरळीत व्यवस्था करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी महापौरांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, घरांमध्ये शिरलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसान आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत माहिती घेतली. नागरिकांनीही आपल्या समस्या महापौरांसमोर मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.