spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साकोली पोलिसांची अवैध दारू तस्करीवर मोठी कारवाई; ७.२६ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

हंसराज भंडारा :- जिल्ह्यातील साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने अवैध दारू तस्करीविरोधात धडक मोहीम राबवत एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. साकोली ते गडकुंभली रोडवर केलेल्या या विशेष कारवाईत पोलिसांनी ७ लाख २६ हजार ७४० रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आरोपी पंकज अमरलाल जगिया (वय ४१, रा. सिव्हील वॉर्ड, साकोली, जि. भंडारा) हा अवैध दारूची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती पोलीस शिपाई कोटवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी साकोली ते गडकुंभली मार्गावर सापळा रचला. संशयित वाहन येताच त्याची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आणि बिअरचा साठा आढळून आला.

जप्त केलेल्या मालाचा सविस्तर तपशील: या कारवाईत पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांच्या दारूचे एकूण १५ प्रकारचे बॉक्स आणि बाटल्या जप्त केल्या आहेत. यामध्ये ट्युबर्ग बिअर (०६ कॅन), किंगफिशर (०४ कॅन), बडवायझर (०६ कॅन व ०४ बाटल्या), मॅकडॉल नं. १ (२ बंपर व ०८ बाटल्या), रॉयल चॅलेंज (१ बंपर व १८ बाटल्या), बेरेल २४ (०२ बाटल्या), ऑल सीजन (०३ बाटल्या), रॉयल स्टॅग (१० बाटल्या), सिग्नेचर (०३ बाटल्या) आणि रॉयल ग्रीन (०२ बाटल्या) यांचा समावेश आहे. या एकूण दारूसाठ्याची किंमत १६,७४० रुपये इतकी आहे. दारूसाठ्यासह तस्करीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी डिझायर कार (क्रमांक MH 36 Z 1743 – किंमत ७,००,००० रुपये) आणि १०,००० रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ७,२६,७४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपी पंकज जगिया याच्याविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६०९/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनापरवाना आणि अवैध रित्या दारूची वाहतूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस शिपाई कोटवार व त्यांच्या पथकाचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास साकोली पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक गांभीर्याने करत आहेत.

Popular Articles