spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पत्रकार आणि परिवारासाठी रविवारी भव्य आरोग्य शिबिर

नागपूर :- टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 2 ऑगस्ट रोजी, सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळात, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमलवाडा, उज्ज्वल नगर येथील गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये होणाऱ्या या शिबिराचा लाभ सर्व माध्यमांमधील जास्तीत जास्त पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन सेंटरचे अध्यक्ष, माजी आमदार संदीप जोशी आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी केले आहे.

या शिबिराचे उद्घाटन रविवारी सकाळी 9 वाजता संदीप जोशी, प्रदीप मैत्र, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव यांच्या हस्ते होईल.

मोफत तपासणी, उपचार

या आरोग्य शिबिरात पुढील आजारांच्या तपासण्या आणि उपचार मोफत केले जातील- नेत्ररोग, अस्थिव्यंग, ह्रदयरोग, मेंदूरोग, बालरोग, मूत्ररोग, कान- नाक- घसा, स्त्रीरोग, त्वचा व गुप्त रोग, मनोविकार, क्षयरोग, श्वसनाचे रोग, ग्रंथीचे विकार, दंतरोग, कर्करोग. तसेच, सर्व प्रकारच्या रक्ततपासण्या, एक्सरे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी, ईसीजी, ईएमजी, 2 डी इको, ममोग्राफी, बीएमडी, पीएफटी चाचण्याही मोफत.

Popular Articles