spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

संजय राऊत, महाराष्ट्रातून गायब झालेल्या उबाठा गटाकडे लक्ष द्या

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :- मोदी सरकार हे केवळ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर लाइव्हपुरते मर्यादित नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार हे मातोश्रीत बसून फेसबुक लाइव्हवर चालणारे सरकार होते. अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयात येणारे उद्धव ठाकरे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंस्टाग्रामच्या माध्यमातून जेन झी शी संवाद साधतात आणि ते आंध्र प्रदेशात लाखो लोकांच्या सभेला संबोधित करून गेले. अमित  शहा दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात येऊन गेले. सातत्याने जनतेशी संवाद साधण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह कुठे आहेत, हे विचारण्यापेक्षा उबाठा गट महाराष्ट्रातून गायब झाला आहे त्याकडे लक्ष द्या, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रश्नांची सरबत्ती करत बन म्हणाले की, अमित शहा यांचा राजीनामा कशासाठी मागत आहात? काश्मीरमध्ये कलम 370 हटवले म्हणून? काश्मीरमध्ये दगडफेक थांबवली म्हणून? बांगलादेशमधील घुसखोरी रोखली म्हणून? पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना घुसून मारले म्हणून? दहशतवाद्यांचा खात्मा केला म्हणून? तुमच्यासारख्या गद्दारांना धडा शिकवला म्हणून? की बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व जिवंत ठेवले म्हणून? ज्या पद्धतीने हिंदुत्वाशी गद्दारी करून तुम्ही राहुल गांधींचे लांगूलचालन करत आहात त्याला अमित शहा विरोध केला म्हणून तुमचा जळफळाट होत आहे. अमित शाह यांनी दहशतवाद, नक्षलवाद संपवला. अमितभाईंना जनतेने निवडून दिले आहे. 140 कोटी जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. तुमच्यासारख्या लोकांनी राजीनामा मागितल्याने काहीही फरक पडत नाही. आमचे अमित शहा यांचा 2029 पर्यंत गृहमंत्री राहतील आणि पुढेही अमित शहा नेतृत्वाखाली भाजपा मार्गक्रमण करत राहील.

ज्या समाजवादी पक्षाने प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारले होते त्यांना राम मंदिराबद्दल किंवा चंदा चोरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत बन म्हणाले, रोहित पवार यांनी दडपशाही काय, गुंडगिरी काय असते, हे एकदा आजोबांना जाऊन विचारावे. शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये गोवारी आदिवासी बांधवांचा मोर्चावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात अनेक आदिवासी बांधवांचे मृत्यू झाले होते. भाजपावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी याचे उत्तर द्यावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्यासारखी स्वतःची दुकानदारी चालवण्याचे काम करत नाहीत. राज ठाकरेंना अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांचे करिअर सेट करायचे आहे. भाजपात कोणाला आपल्या मुलांचे, नातवांचे किंवा पतवंडांचे करिअर सेट करायचे नाही. हाच भाजपा आणि इतर पक्षांमध्ये फरक आहे. तुमच्यासारखे घर चालवण्यासाठी आणि मातोश्री टिकवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तरुणांचे आंदोलन होत नाही. पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवरून तरुणाईशी संवाद साधून तुमची हवा काढून घेतल्याने तुमच्या पोटात दुखते आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजकंटक या देशात नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न करत होते. अशा लोकांना सोडले जाणार नाही. सरकारने याची गंभीरपणे दखल घेतली असल्याचे बन यांनी स्पष्ट केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.