spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ओबीएन राज्यस्तरीय अबॅकस व रेनबो ड्रॉईंग स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

– भंडाऱ्यात राज्यस्तरीय स्पर्धेचे शानदार आयोजन; मान्यवरांकडून विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक

हंसराज,भंडारा :- ओबीएन अबॅकसतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस व रेनबो ड्रॉईंग स्पर्धा २०२६ नुकतीच भंडारा येथील आनंद मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलचे प्राचार्य अंकुश मुले आणि नूतन महाराष्ट्र विद्यालय, भंडाराचे प्राचार्य दिनेश साकुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीएनचे संस्थापक-संचालक नितीन निनावे, विजय केवट, किशोर बरसागडे, समीर नवाज आणि शैलेश पाटले उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य अंकुश मुले म्हणाले की, “अबॅकस शिक्षण हे केवळ गणितापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी आणि एकाग्रतेसाठी अत्यंत आवश्यक आहे.” प्राचार्य दिनेश साकुरे यांनी चित्रकला स्पर्धेचे कौतुक करताना सांगितले की, “चित्रकला हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला वाव देणारे एक प्रभावी माध्यम आहे.”

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश दिला. स्पर्धेचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणिते सोडवण्याचा वेग आणि अचूकता सिद्ध केली, तर चित्रकला स्पर्धेत रंग आणि रेषांच्या माध्यमातून आपली कल्पकता मांडली. या प्रसंगी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ओबीएन टीमचे संचालक अजयकुमार निनावे यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ निशाणे, मेघा कांबळे, श्वेता लांजेवार, कोमल बुधे, यामिनी वाडीभासमे, मौप्रिया कर, पियुष मेश्राम, पूजा नेरकर, निकिता गौपाले आणि हर्षा गौपाले यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि पालकांचे ओबीएन परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

Popular Articles