spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

’मेरा रेशम, मेरा अभिमान 2.0’ अंतर्गत कार्यशाळा ; शेतकऱ्यांना तुती लागवड करण्याचे आवाहन

– भरगोस उत्पन्न वाढविण्याची संधी

यवतमाळ :- ‘मेरा रेशम मेरा अभिमान 2.0’ स्टेकहोल्डर अंतर्गत तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, यवतमाळ येथे सोमवारी दि. ३ ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीकरीता मोठ्या प्रमाणात वाव असून जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थीतीवर मात करुन शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधण्यासाठी रेशीम शेती प्रमुख पर्याय ठरु शकतो. पारंपारिक पिकांसोबतच कमी खर्चात आर्थिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी रेशीम शेतीला प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाने केले आहे.

रेशीम शेती वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा उत्पन्न मिळवून देणारी व कमी खर्चाची असल्याने याकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी शासनाकडून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अर्थात व्हीबी जीरामजी) व सिल्क समग्र-2 या योजनांमधून अनुदान दिल्या जाते.

या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमीन तसेच बारमाही सिंचनाची सोय उपलब्ध असावी. रेशीम कोषाला आजच्या तारखेला बीड मार्केट मध्ये 835 रुपये प्रती किलो असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने तुती लागवड करुन रेशीम कोषाचे उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आले.

या कार्यशाळेत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड, केंद्रीय रेशीम बोर्डाच्या सी अनुसंधान विस्तार केंद्राचे वैज्ञानिक प्रमोद ससवीखली, केंद्रीय रेशीम बोर्डाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक बि. एल. कुमावत, वरिष्ठ क्षेत्र सहायक एल. बि. येवले, क्षेत्र सहय्यक एस. व्ही. गोडे, तांत्रिक सहायक आर. एस. राठोड व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Popular Articles