spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे अवैध गोवंश वाहतुकीवर स्थागुशा नागपुर ग्रामिण पोलिसांची कारवाई

– २८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ११ गोवंशांची सुटका, दोघे अटकेत

कन्हान :-  पोलिसांनी अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून ११ गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्याविरुद्ध कन्हान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.९) ऑगस्ट २०२६ ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कन्हान हद्दीतील तारसा रोड येथे नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी संशयित ट्रक क्र. एमएच-४०/सीटी-७८९३ पोलिसांना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता काही अंतरावर वाहन सोडुन पळ काढला. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये ११ गोवंश जनावरे आढळुन आली. जनावरांना चारापाण्याची सोय न करता, कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखं डाने बांधुन वाहतुक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी करून ट्रकसह गोवंश जनावरे ताब्यात घेतली. या कारवाईत ट्रक किंमत २० लाख रुपये, ११ गोवंश जनावरे किंमत २ लाख ८० हजार रुपये, टोयोटा ग्लान्जा कार किंमत ६ लाख रुपये व एक अँड्रॉइड मोबाईल किंमत १० हजार रुपये असा एकुण २८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी इर्शाद अब्दुल सय्यद वय ३५ वर्ष, रा. कामठी आणि मोहम्मद रियाज अब्दुल रहीम कुरेशी वय ३९ वर्ष, रा. कामठी यांना अटक करण्यात आली. तसेच ट्रक चालका विरुद्ध कन्हान पोलीस ठाण्यात कलम ११(१), (क), (ड), (ज), (ई), (फ) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, सहकलम ५(अ), (१) महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलिसांच्या कारवाई मुळे अवैध गोवंश वाहतुक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असुन पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.

Popular Articles