spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खाप्यात छब्बिसवी भक्तिभावाने साजरी, उर्स-ए-आला हजरत यांच्या १०८व्या उर्सनिमित्त दर्ग्यात फातेहा; देशाच्या सुख-शांतीसाठी विशेष दुआ

खापा, वार्ताहर :- महाराष्ट्र राज्य पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त खापा शहरातील प्रसिद्ध सैय्यद हजरत बाबा सैय्यद लष्कर शाह शहीद रहमतुल्ला अलैह यांच्या दर्ग्यात छब्बिसवी तसेच उर्स-ए-आला हजरत यांच्या १०८ व्या उर्सनिमित्त धार्मिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने पार पडला. यावेळी फातेहा पठण करून देशात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा, यासाठी विशेष दुआ करण्यात आली. समा माहेफिलचे आयोजन करण्यात आले होते.

नमाज-ए-असरनंतर सायंकाळी साडेपाच वाजता दर्ग्यातील बाबांच्या मजारवर चादर व फुल अर्पण करण्यात आले. त्यानंतर फातेहा पठण करण्यात आली. उपस्थित भाविकांनी देशाच्या शांतता, प्रगती आणि सर्व समाजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

या निमित्ताने दर्गा परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. खापा शहरासह परिसरातील शेकडो श्रद्धाळूंनी कार्यक्रमाला उपस्थिती लावत दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक कार्यक्रमामुळे दर्गा परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दर्गा कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हाजी अल्ताफ (बब्लू) शेख, प्यारु शेख, आसिफ शेख, फिरोज शेख, साकीर शेख, युनुस कुरेशी, फिरोज (गुड्डू) पठाण, असलम शाह, कशीफ सुभेदार, साहिल शेख, जाकीर शाह, रोशन कामडी, खादीम शब्बीर बावा शेख तसेच नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या धार्मिक सोहळ्याच्या माध्यमातून श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.