कामठी :- अखिल भारतीय गोस्वामी समाज महासभा भारत दिल्ली अंतर्गत गोस्वामी समाज महासभां नागपूर चा वतीने आज जयंती उत्सव साजरा करण्यात आला हा उत्सव गोस्वामी समाज महासभा नागपूरचे अध्यक्ष महंत कृष्णकांत गिरी यांच्या परवानगीने घेण्यात आला गोसावी समाजाचे युवा नेतृत्व, गोस्वामी समाज महासभा नागपूर चे शहर अध्यक्ष डॉ. अनिल गिरी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गणेश पुरी ( विदर्भ अध्यक्ष – हिंदू विश्वगुरु दशनाम संघटना) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनिल गिरी होते यामध्ये वी वी गिरी यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश पुरी यांनी अमूल्य मार्गदर्शन केले, अनिल गिरी यांच्या वाढदिवसाचा मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या व शाल श्रीफळ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाचे संचालन मधुकर गोस्वामी , आभार प्रदर्शन विवेक गिरी यांनी केले. याप्रसंगी उपस्थित शंकर पुरी, प्रशांत गिरी अरुण गिरी होते सरते शेवटी कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्याबद्दल व ऑफिस मध्ये मुबलक सोय करून दिल्याबद्दल कृष्णकांत गिरी यांचे शतशः आभार माणण्यात आले.
गोस्वामी समाज महासभा नागपूरच्या वतीने भारतरत्न माजी राष्ट्रपती वी. वी. गिरी यांची जयंती उत्साहात साजरी









